Categories
कायदा

जितके दिवस तपास लांबणार तितके दिवस आपल्या लोकशाहीला धोका

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

7 सप्टेंबर 2017 ला बेंगलोर येथे गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. गौरी लंकेश या एक कार्यकर्त्या-पत्रकार होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे कन्नड मधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक होते. गौरी आपल्या वडिलांचे ध्येयवादी पत्रकारितेचे काम नेटाने पुढे नेत होत्या. धार्मिक कट्टरीकरणाच्या विरोधात निर्भयपणे गौरी लंकेश आवाज उठवत होत्या. ‘लंकेश पत्रिके’च्या अंकाचे काम संपवून घरी […]

Categories
पर्दाफाश

कोल्हापुरात भोंदू डॉक्टरचा अंनिसने केला पर्दाफाश…

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

‘मुलगाच होईल’ असे सांगून फसवणार्‍या भरत जिनगोंडा पाटील यास (हलोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या 32 (2) व 33 (अ) या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली. महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूर शाखेच्या बुवाबाजीविरोधी कार्यवाह गीता हासूरकर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरून निघाल्या असताना त्यांनी ‘हमखास मुलगाच होईल’ अशा […]

Categories
चळवळ

महाराष्ट्र अंनिसचा केरळ अभ्यास दौरा

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

देशभरात विज्ञान प्रचार-प्रसाराचे काम करणार्‍या अनेक संस्था-संघटना आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक प्रश्नांवर लढणार्‍या आहेत. जातीच्या, धर्माच्या, देवाच्या उपासनेच्या नावाखाली होणार्‍या शोषणाच्या विरोधात त्या-त्या राज्यातील संघटनांच्या ताकदीप्रमाणे बदलाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवून काम करणार्‍या संस्था-संघटना आहेत. अशा देशातल्या संघटनांचं एक फेडरेशन करण्यात आलं आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (FIRA), ज्याचे मेंगलोर (कर्नाटक) येथील नरेंद्र नायक हे […]

Categories
शिबिर

व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर धुळे येथे संपन्न

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

धुळे येथील सामाजिक न्याय भवनात व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचतर्फे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे व्यसनाच्या फलकावर फुली मारून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी बी. एस. पाटील, अन्नसुरक्षा विभागाचे गोपाळ कासार, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जयश्री शहा, डॉ. सुरेश बिर्‍हाडे, नवल ठाकरे आदींची उपस्थिती होती. ताणतणावातून मुक्ती मिळावी म्हणून व्यसन करणे हा त्यावरील उपाय नाही; तसेच […]

Categories
शाखा वार्ता

नागपुरात स्मशान सहल…

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत असलेल्या शाखा उत्तर नागपूरच्या वतीने ‘शोध भुताचा बोध मनाचा’ वर्ष तिसर्‍या स्मशान सहलीचे अमावस्येच्या रात्री मंगळवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी 08:30 ते 12:30 पर्यंत वैशाली नगर स्मशानभूमी, नागपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने स्मशान सहलीचे आयोजन महा.अंनिस शाखा अध्यक्ष रामभाऊ डोंगरे यांनी केले होते. पथनाट्य […]

Categories
संपादकीय

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय बुवाशरण मानसिकता समूळ नष्ट होणार नाही

जून - २०१८

पाच वर्षांची कोर्टबाजी, साक्षीदारांचे खून, पीडित मुलीला, तिच्या कुटुंबियांना, वकिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, भक्तांकडून दहशत माजवून न्यायालय, शासन, पोलीस यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न, सत्ताधारी, विरोधक राजकारणी यांची छुपी-उघड सहानुभूती, मदत, स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणार्‍या सनातनी गुंडांचे उघड समर्थन, देशातील सर्वांत नामवंत वकिलांची फौज उभी करूनही आसारामला अखेर कोर्टाने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मरेपर्यंत […]

Categories
कव्हर स्टोरी

‘व्हॅटिकन’मधील बुवाबाजी

जून - २०१८

‘व्हॅटिकन सिटी’ हे स्थान ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र समजले जाते. पोप हे सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू ‘व्हॅटिकन’मध्ये राहतात. जगभरातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना याठिकाणी धर्मासंदर्भातील विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. ‘व्हॅटिकन सिटी’ ही सध्या एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आलेली आहे. भूतपिशाच, अतींद्रियशक्ती यांची बाधा झालेल्या लोकांची कशी उतरवावी, याविषयीचा एक विशेष कोर्स व्हॅटिकन सिटीमध्ये घेण्यात आल्यामुळे जगभरात याविषयी […]

Categories
कव्हर स्टोरी

ख्रिश्चन धार्मिकांच्या काही श्रद्धा(?)

जून - २०१८

इतर धर्मांच्या धार्मिकांप्रमाणे ख्रिश्चन धार्मिकसुद्धा फलज्योतिष, पुनर्जन्म, शरीरबाह्य अनुभव (out of body experience), भूत, भानामती, अतींद्रिय शक्ती, परमेश्वरी चमत्कार, प्रार्थनेतून इष्टपूर्ती इ. अनेक श्रद्धा-अंधश्रद्धावर (अजूनही) विश्वास ठेवतात. परंतु काही श्रद्धांचे प्रकार मात्र ख्रिश्चन धर्माशीच निगडित आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या श्रद्धा खालील प्रमाणे आहेत. * ख्रिश्चन धार्मिकांच्या ‘कम्युनियन’ या विधीच्या वेळी प्रीस्ट/बिशप यांनी खाण्यासाठी वापरलेला ब्रेड […]

Categories
छद्मविज्ञान

फोबिया : सेलफोन आणि पॉवर लाईनचा

जून - २०१८

अमेरिकेतील दक्षिणेकडील टेक्सास राज्य. ऑस्टीन ही राज्याची राजधानी. तेथे माझ्या कन्येकडे सपत्नीक गेलोय. प्रशस्त अशा घराच्या बॅकयार्डमध्ये झोपाळ्यावर विचार करीत बसलोय. स्वत: फसणं आणि दुसर्‍याला फसवणं हा माणसाचा स्वभावधर्म आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र तो दृष्टीस पडतो. प्रकाशाच्या वाटा दाखविणारे ज्ञानवंत मानवास शहाणपणाकडे घेऊन जातात; उलट अज्ञानाच्या गुहेकडे नेऊन त्यांच्या मूर्खपणाचा फायदा उपटणारेही कमी नसतात. विज्ञानाच्या […]

Categories
उपक्रम जो.वि.नि

जोडीदाराची विवेकी निवड : काय पाहून कराल?

जून - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे संघटनेचा पुढील दशकातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून बघायचे. व्यवसायाची निवड आणि जोडीदाराची निवड या तरुणांच्या भावी आयुष्यावर खोलवर परिणाम करणार्‍या दोन बाबी आहेत. यापैकी, व्यवसाय निवडीचा सर्वांगीण विचार कसा करावा, या विषयीच्या माहितीचे अभिसरण आपल्या समाजात सुरू झालेले आहे. जोडीदाराची निवड या विषयाचा […]