Categories
अभिवादन

डॉ. सुलभा ब्रह्मे यांना विनम्र अभिवादन

फेब्रुवारी – २०१७

ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, लोकविज्ञान संघटनेच्या संस्थापक सदस्या आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे 1 डिसेंबर 2016 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. सुलभाताईंचा जन्म सातारला 1932 मध्ये झाला. सुलभाताई या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, सहकार चळवळीचे प्रवर्तक धनंजयराव गाडगीळ व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला काळे यांच्या कन्या. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ हे त्यांचे […]

Categories
अभिवादन

राजकीय शिक्षणाचा चैतन्यशील स्रोत – कॉ. गोविंद पानसरे

फेब्रुवारी – २०१७

16 फेब्रुवारी 2015 या दिवशी कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला झाला आणि 20 फेबु्रवारी 2015 रोजी त्यांचा दु:खद अंत झाला. तेव्हापासून साहजिकच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची कमी ठळकपणे जाणवते आहे. एक विवेकी, मार्क्सवादी विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कामगार चळवळीचा ज्येष्ठ नेता, कामगारांचा बुद्धिमान वकील, सामाजिक व राजकीय चळवळीतील धडाडीचे व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील माणूस अशा […]

Categories
अभिवादन

ज्येष्ठ संपादक दिलीप पाडगावकर यांना विनम्र अभिवादन

फेब्रुवारी – २०१७

भारतीय म्हणून आपण भारतीय विविधतेला मानतो. पण आज याच विविधतेला संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे परिवर्तनवादी चळवळीसमोरचे मोठे आव्हान आहे. यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी, साध्या सोप्या शब्दांत सांगावे, अहिंसेच्या मार्गाने लोकांना प्रबोधित करीत संवाद करावा, असे मार्गदर्शन अंनिसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र अंनिसच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात करणार्‍या ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक दिलीप पाडगावकर यांचे पुणे […]

Categories
परिवर्तन

ज्योतिषी ते अंनिस कार्यकर्ता

फेब्रुवारी – २०१७

‘धार्मिक ते विवेकवादी’ असा प्रवास झालेल्या काही अंनिस कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास अं. नि. वार्तापत्रातून आम्ही ‘बि’घडलो या सदरातून दरमहा प्रसिद्ध करणार आहोत. कार्यकर्त्यांचा विवेकी जीवनप्रवास वाचून वाचकांना यातून प्रेरणा मिळेल. मी प्रकाश तमण्णा हिरेमठ. वय वर्षे 43. रा. कोल्हापूर. व्यवसाय पौरोहित्य करणे. गेली 20 वर्षे मी पौरोहित्य करीत होतो, गेल्या 4 वर्षांपासून मी ज्योतिष (भविष्य) सांगणे […]

Categories
अभिवादन

समीक्षक विचारवंत वसंतराव पळशीकर यांना विनम्र अभिवादन!

फेब्रुवारी – २०१७

विचारांच्या क्षेत्रात लहान-मोठे कार्य करणार्‍या, विचारांविषयी आस्था असणार्‍या मंडळींनी विचारांच्या क्षेत्रातील शोचनीय परिस्थिती सुधारण्याचे काम अंतर्मुख होऊन प्रथमत: हाती घ्यायला हवे. ही गोष्ट विचारवंतांची एक संघटना बांधून वा पक्ष स्थापन करून साध्य होणारी नाही. वैयक्तिक व छोट्या समूहांच्या पातळीवर चोख, कसदार विचार करावयास लागणे, हा एक मार्ग आहे. आपल्या सह-विचारवंतांच्या वैचारिक कृतींची चोख समीक्षा करणे […]

Categories
प्रतिसाद

शासकीय कार्यालयात पूजाबंदी?

फेब्रुवारी – २०१७

सध्याचे युग हे सोशल मीडियाने प्रभावित केले आहे. विविध प्रकारच्या चर्चा, वाद सोशल मीडियात होत असतात. हा मीडिया वापरण्यात तरुण पिढी अग्रेसर आहे. म्हणून अंनिवाने खास तरुणांसाठी असलेल्या या सदरात चालू घडामोडीवरील चर्चात्मक लेख दरमहा देण्याचे ठरविले आहे. मागील महिन्यातील एखाद्या विषयातील सोशल मीडियातील चर्चा या सदरात आम्ही प्रतीकात्मक देत आहोत. “मंत्रालयासह राज्यातील शासकीय, निमशासकीय […]

Categories
उपक्रम

‘टग्यांची’ पाडळी ते ‘सत्यशोधक’ पाडळी

फेब्रुवारी – २०१७

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळीची खरी ओळख महाराष्ट्राला झाली ती ‘फटाकेमुक्त दिवाळी’मुळे. पाडळी गाव, रानातील घरे, वाडी व वस्ती कुठेही दिवाळीत फटाका फोडला जात नाही. दुकानदार फटाके विकत नाहीत. विद्यार्थी व शिक्षक गावातून प्रबोधन फेरी काढतात. ‘मी फटाके फोडणार नाही,’ अशी प्रतिज्ञा घेतात. गेली चार वर्षे पाडळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहे. शेतकरी मोफत वाचनालय, […]

Categories
पुस्तक परिचय

अंधारातून प्रकाशाकडे

फेब्रुवारी – २०१७

गोवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यज्ञेश्वर निगळे यांचा ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हा वैचारिक (पुरोगामी) लेखसंग्रह पुस्तकरुपात प्रसिद्ध झाला आहे. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा निगळे यांनी त्यांच्या लिखाणातून कायम प्रसार केला आहे. या लेखसंग्रहाला गोव्यातील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. अमृत कासार यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेचा संपादित अंश पुढीलप्रमाणे… या […]

Categories
पुस्तक परिचय

परिवर्तनाच्या वाटेवरील काटे

फेब्रुवारी – २०१७

चंद्रसेन टिळेकर या ज्येष्ठ विज्ञानवादी कार्यकर्त्याचा ‘परिवर्तनाच्या वाटेवरील काटे’ हा लेखसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मुखपृष्ठावरील चित्रात सावित्रीबाई व जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिवर्तनाचा रथ हाकताना दिसत आहेत व सनातनी, धर्मांध व प्रतिगामी यांच्या वाटेत अडथळे निर्माण करत आहेत. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अनेकदा परिवर्तनाच्या प्रक्रियेला अडथळा ठरेल, असे वक्तव्य करताना […]

Categories
अभियान चळवळ

‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’

फेब्रुवारी – २०१७

महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान 3 ते 12 जानेवारी 2017 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला सहभाग विभागातर्फे 3 जानेवारी, ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ ते 12 जानेवारी, ‘राजमाता जिजाबाई जयंती’ या दरम्यान महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान घेण्यात आले. ‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम सादर करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी ‘जातिअंत’ […]