Categories
चिकित्सा प्रतिसाद

युवकांच्या प्रेमदिनाला सनातन्यांचा खोडा!

मार्च - २०१७

सध्याचे युग हे सोशल मीडियाने प्रभावित केले आहे. विविध प्रकारच्या चर्चा, वाद सोशल मीडियात होत असतात. हा मीडिया वापरण्यात तरुण पिढी अग्रेसर आहे. म्हणून अंनिवाने खास तरुणांसाठी असलेल्या या सदरात चालू घडामोडीवरील चर्चात्मक लेख दरमहा देण्याचे ठरविले आहे. मागील महिन्यातील एखाद्या विषयावरील सोशल मीडियातील चर्चा या सदरात आम्ही देत आहोत. युगानुयुगे ‘ती’ आणि ‘तो’ प्रेमात […]

Categories
भांडाफोड

पवनी येथील ढोंगी मौलानाचा अंनिसने केला भांडाफोड

मार्च - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे तोंडी तक्रार मिळाली की, ‘पवनी येथे भाई तलाव वॉर्डात, मशिदीला लागून असलेल्या ठिकाणी, मौलाना बाबा या नावाने प्रसिद्ध असणारी व्यक्ती दर शनिवारी स्वत:च्या अंगात दैवीशक्ती असल्याचा दावा करते, चमत्कार दाखवते व रोगमुक्त करण्याचे आश्वासन देते. हा बाबा जादूटोणा, करणी, भूतबाधा दूर करण्यासाठी मंत्रतंत्र करून राख, धागा, पाणी, तावीज […]

Categories
परिवर्तन

…आणि मी वास्तुशास्त्र नाकारले

मार्च - २०१७

– अरविंद पाखले मी बांधकाम व्यावसायिक आहे. कुतुहलापोटी वास्तुशास्त्रावरील एक पुस्तक वाचले. आणि नकळत या शास्त्राकडे आकर्षित झालो. माझ्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केले. पण अनुभवांनी माझा भ्रमनिरास झाला. माझ्या घराची रचना पूर्ववत केली आणि वास्तुशास्त्र या अंधश्रद्धेबाबत लोकांचे प्रबोधन करू लागलो. हे कसे घडले? प्रथम वास्तुशास्त्राची माहिती घेऊया. या शास्त्रात दिशांना महत्त्व आहे. पूर्व – […]

Categories
उपक्रम

कल्पना चावला विज्ञान केंद्र विज्ञान शिक्षणाचा अभिनव प्रयोग

मार्च - २०१७

आपण बहुतेकजण मळलेल्या वाटेवरचा प्रवास पसंत करतो. कराड (जि. सातारा) येथील कल्पना चावला विज्ञान केंद्राचे सर्वेसर्वा संजय पुजारी याला अपवाद आहेत. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल नुकतेच त्यांना राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मुलांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात […]

Categories
चळवळ

मअंनिसचा दिल्ली दौरा यशस्वी

मार्च - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 42 महिने पूर्ण झाले. त्यानंतर त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचेही खून झाले. तपास प्रक्रियेतून जे निष्पन्न झाले आहे, ते आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र तपास समाधानकारक नाही, ही खंत आहे. मअंनिस गेली 42 महिने अत्यंत चिकाटीने, सातत्यपूर्वक अहिंसक […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

मुंबई, दिल्लीपासून देश-विदेशामध्ये, भारतीय कसावर आधारित विवेकवाद पोचवायचाय!

मार्च - २०१७

नुकतीच दिल्ली वारी आम्ही करून आलो. पक्षीय आणि देशाच्या श्रेष्ठींना आपल्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी! त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रबोधन व संघर्षाची साथ संगत होतीच. यापुढे दिल्लीत नियमित जात राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला आवाज पोचविण्यासाठी. आता तर परराज्यातील कामाच्या विस्ताराची सुरुवात आपण देशाच्या राजधानीतून दिल्लीतूनच केली आहे. त्यासह महाराष्ट्रालगतच्या सहा राज्यांमध्ये […]

Categories
संपादकीय

विज्ञानगौरव

फेब्रुवारी – २०१७

28 फेबु्रवारी हा दिवस प्रतिवर्षी विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विज्ञानाचा गौरव करणारे कार्यक्रम शैक्षणिक संस्थांमधून साजरे होतात. आपल्या व्यवहारात सर्वत्र विज्ञानावर आधारित साधनांची रेलचेल झालेली दिसते. आपण साधनांचा सतत वापर करीत असल्यामुळे ही साधने निर्माण कशी झाली, याबाबत आपणाला कुतूहल वाटेनासे झाले आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा गौरवशाली इतिहास समजून घेतला, तर मन आश्चर्याने […]

Categories
धर्म आणि विज्ञान

धर्मचिकित्सा

फेब्रुवारी – २०१७

चिकित्सेला आक्षेप धर्माच्या अतिरंजित दाव्यांवर लोक विश्वास का ठेवतात? चिकित्सा म्हणजे काय हे त्यांनी कधी ऐकलेलंच नाही म्हणून का? जवळजवळ सर्वच पारंपरिक धार्मिक श्रद्धा विज्ञानपूर्व काळामध्ये म्हणजे वैज्ञानिक पद्धती वापरात येण्याअगोदर जन्माला आलेल्या आहेत. धार्मिक सिद्धांतांच्या उगमाचा छडा निःपक्षपाती अभ्यासाने किंवा वैज्ञानिक शोध पद्धतीने लावणे अत्यंत कठीण आहे; विशेषतः जेव्हा पवित्र धार्मिक सत्यांच्या आधारांची चिकित्सा […]

Categories
जादुई वास्तव

सत्य कोणतं आणि जादू कुठली?

फेब्रुवारी – २०१७

भाग : २ अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर डॉ. रिचर्ड डॉकिन्स हे सुप्रसिद्ध विवेकवादी वैज्ञानिक. विज्ञान लोकप्रिय करण्याचं त्यांचं कार्य अमोल आहे. अं. नि. वार्तापत्रही हे कार्य करते. अंनिसच्या प्रबोधनाचा हेतू लक्षात घेऊन डॉ. डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘दि मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचा मराठीत भावानुवाद ‘अं.नि.वार्तापत्रा’साठी करण्यास डॉ. शंतनु अभ्यंकर यांना परवानगी दिली. जागतिक […]

Categories
अघोरी प्रथा

क्रूरतेच्या पुढच्या अंकाची नांदी व्हाया जलिकट्टू

फेब्रुवारी – २०१७

जलिकट्टू, तामिळनाडूमधील मोजून चार जिल्ह्यांत खेळला जाणारा हा प्रकार मागच्या काही दिवसांत ‘त्सुनामी’ सारखा आला आणि त्यानं मानवानं बनाव करून रचलेलं सर्व संचित उद्ध्वस्त केलं. धर्म, संस्कृती या बाबी मानवकेंद्री तर नसतातच, तर त्या सजीवकेंद्री पण नसतात हे समीकरण घट्ट करणारं सगळं आता घडतंय, उद्या ते दिसणार आहे, त्याला निमित्तमात्र आहे ते म्हणजे जलिकट्टू. जलिकट्टूवर […]