महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणारा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान करण्यात आला…! तसेच ’जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाअंतर्गत अनेक अडचणींना तोंड देत विवाहबद्ध होऊन वेगळी वाट चोखाळणार्या नंदना गजभिये आणि तुषार शिंदे या नवदांपत्याला राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘नरहरी राऊत […]
लेखक: arc_admin
स्त्रीशक्तीला सलाम!
कल्पना चावला ‘नासा’ या अंतरिक्ष क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेत निवड झालेली वीरांगना. अवकाशातून भ्रमण करीत असताना तिने समस्त पृथ्वीवासियांना एक वाक्य ऐकविले. ती म्हणाली, ‘ही पृथ्वी बघताना मला एकच वाटते, हे संपूर्ण ब्रह्मांड माझे घर आहे.’ जात, धर्म, लिंग भेदाच्या पलिकडे नेणारे हे उद्गार आपणा सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. आठ मार्चला ‘महिला गौरव दिन’ आहे. […]
मुस्लिम स्त्रियांच्या जगण्याचा कोलाज
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख आजच्या घडीला मुस्लिम समाजातील मुलींची नवी पिढी शिक्षण घेताना दिसत आहे. नोकरी, करिअर करतानाही दिसत आहे; मात्र एकूण सार्वत्रिक विचार करता हे प्रमाण खूप कमी आहे; तरीही आपल्या अन्याय- अत्याचारावरची जाणीव समजून त्या छोटे-छोटे लढे देण्यास तयार होत आहेत. अगदी धार्मिक स्तरावरही. अर्थात धर्माची चौकट मोडून एखादा विचार […]
‘स्त्री – पापाचे द्वार?’
‘हे असंच चालायचं!’ अशी नकारार्थी मानसिकता व्यक्त करणारी वाक्ये आपण आपल्या बोलीभाषेत नेहमी वापरतो. अशा प्रकारच्या वाक्यांचा समाचार या सदरात घेणार आहोत… ‘स्त्री हे पापाचे द्वार आहे,’ हे वाक्य म्हणजे पुरुषांनी स्त्रीवर मिळविलेल्या विजयाची पताका आहे. ही पताका फडकवत शेकडो वर्षे स्त्रियांना गुलामीत ठेवता आले. या वाक्याचा अर्थ विविध धार्मिक ग्रंथांतून सतत पसरत असतो. अर्थात, […]
‘झेप – एक भरारी आत्मसन्मानासाठी’
‘अंनिस’च्या पनवेल शाखेचा अभिनव उपक्रम दि. 3 ते 12 जानेवारी या दरम्यान दरवर्षीप्रमाणे ‘महिला सबलीकरण प्रबोधन अभियान’ राबविण्याचा विचार करीत असताना सारखं जाणवत होतं की, ‘आपण यापलिकडे जाऊन वेगळं काहीतरी करायला हवं.’ म्हणजे महिलांच्या समूहात, त्यांच्या सोयीने त्यांना एकत्र करून कार्यक्रम करतोय, त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय; परंतु अधिक मोकळं आणि त्यांच्या भावविश्वाला भिडणारं काहीतरी करावं, […]
सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद असे मार्ग सर्वच पक्षाचे उमेदवार वापरीत असतात. पण, पुण्यात जे घडलं ते काहीतरी वेगळंच आहे. चर्होली मोशी प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या शैला मोळक या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा देखील आहेत. पण, त्यांच्या नावानं या अशा काळ्या बाहुल्या त्यांच्या घरासमोर आणि बूथच्या आसपास टाकण्यात आल्या. त्यावर […]
पहिला माणूस कसा तयार झाला?
प्रकरण 2 डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअॅलीटी’ या पुस्तकातील, हू वॉज द फर्स्ट पर्सन’ या प्रकरणाचा मराठी भावानुवाद. अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर या पुस्तकातल्या बहुतेक प्रकरणांची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे. निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ उत्तर दिलंय. पण सुरुवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली […]
अंनिसचा झुंजार ‘वाघ’ हरपला!
महाराष्ट्र अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ. मच्छिंद्र वाघ, रा. नेवासा, जि. अहमदनगर यांचे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मच्छिंद्र वाघ हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ‘आरोग्य सेवक’ म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्याकाळी लोक त्यांना डॉक्टर म्हणूनच हाक मारीत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हागणदारीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती. डॉ. वाघ हे 1991 […]
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… मध्ययुगीन कालखंडात भारतीय समाज हा जातिवर्णव्यवस्थेच्या चातुर्वर्णात विभागला गेला होता. त्यातही विभिन्न जाती, उपजातीत समाज छिन्नविछिन्न झाला होता. ‘जात’ ही मानवनिर्मित व्यवस्था असून ती केवळ एका विशिष्ट समुदायाचे हितसंबंध जोपासण्यासाठी, समाजात भेद पसरविण्यासाठी अस्तित्वात आणली गेली व टिकविण्यात आली. याचे सखोल […]
पंधरा दिवसांत तीन महिला जटमुक्त…
पुणे शाखेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी 15 दिवसांमध्ये तीन महिलांचे समुपदेशन करून त्यांच्या जटा सोडविल्या. सुनंदा बोराडे, निर्मला जगताप आणि अनिता पात्रोड या तीन कष्टकरी महिलांच्या जटा सोडवून त्यांच्या डोईवरचे ओझे उतरविले. याबाबत अनिता पात्रोड या महिलेची जटा निर्मूलनाची कहाणी खाली देत आहोत… अनिता पात्रोड, वय वर्षे 40, यांच्या डोक्यात पंधरा वर्षांपूर्वी जट (केसांचा […]