Categories
बुवाबाजी

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर

वार्षिकांक - २०१७

हे एकच गुरू असतील की, ज्यांच्या नावापुढे दोनदा ‘श्री’कार असेल. 2009च्या फोर्ब्स या जागतिक संस्थेच्या भारतातील सात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत श्री श्री रविशंकर (यानंतर श्री श्री म्हणून पूर्ण लेखात उल्लेख असेल.) यांचे नाव झळकत होते. अध्यात्माच्या बाजारीकरणातून भरपूर मालमत्ता कमावलेले ते एक आध्यात्मिक जगाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. 1981 च्या सुमारास बंगळुरू येथे लहान रोपटे असलेले […]

Categories
बुवाबाजी

सद्गुरू जग्गी वासुदेव यांची ‘गुरु’गिरी

वार्षिकांक - २०१७

21 व्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्नं बघणार्‍या आपल्या देशाला प्रत्येक दशकाला प्रत्येक वर्षाला, एखाद्या नव्याकोर्‍या अवताराची गरज भासते व या अवताराला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विलक्षण असे काहीतरी करून जनसामाऩ्यांना अचंबित करावे लागते. मागील एक-दोन दशकांत जनसामान्यांसकट मध्यम व श्रीमंत वर्गाला मानसिक व शारीरिक आरोग्याची भलतीच काळजी वाटू लागली आहे. न परवडणारे हॉस्पिटल बिल्स व […]

Categories
बुवाबाजी

वादग्रस्त आसारामबापू

वार्षिकांक - २०१७

सप्टेंबर 2013 मध्ये स्वत:ला संतश्री म्हणवून घेणार्‍या 76 वर्षांच्या आसारामबापूंना 16 वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. बलात्काराच्या आरोपाबरोबर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर बंदीवासात ठेवणे, जादूटोणा, जमीन बळकावणे, दहशत माजविणे आणि खून असे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. पण इतके गंभीर आरोप असूनही हा खटला जलदगती न्यायालयात चालविला गेला नाही आणि आजही […]

Categories
बुवाबाजी

भुलभुलैय्या बाबा रामदेव

वार्षिकांक - २०१७

Rediff.com ने भारतातील 10 अतिवादग्रस्त गुरूंच्या यादीत बाबा रामदेवचा समावेश केला आहे. संत रामपाल, आसाराम बापू, स्वामी नित्यानंद, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश, रजनीश, चंद्रास्वामी, जयेंद्र सरस्वती, गुरमीत राम रहीम आणि सत्य साईबाबा हे ते दहा गुरू. बाबा रामदेवबाबत काय आक्षेप आहेत? तहेलका मासिकाने बाबा रामदेवच्या ट्रस्टमध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार असल्याचे उघड केले आहे. वृंदा करात […]

Categories
बुवाबाजी

पानीवालेबाबाने केला पोबारा : अंनिसमुळे नागरिकांमध्ये जागृती

जुलै - २०१७

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात अनेक दिवसांपासून झोपडीवजा कुटीमध्ये रुपन कल्याण बरूआ ऊर्फ पाणीवाले बाबाने बस्तान मांडले होते. दैवीशक्तीने पाणी देऊन रोगांवर उपचार करून भोळ्याभाबड्या नागरिकांना लुटण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. मात्र भुसावळच्या अंनिस शाखेच्या पदाधिकार्‍यांनी आव्हान देताच त्याने बस्तान गुंडाळून पोबारा केला. पाणीवाले बाबा गेल्या अनेक दिवसांपासून कंडारी परिसरात पाणी-मंत्राने अनेक आजार […]

Categories
बुवाबाजी

अपशकुनी मुलीला मारून टाका असा सल्ला देणार्‍या देवऋषी बाईला अटक

जून – २०१७

सातारा : ‘जन्माला आलेली मुलगी अपशकुनी आहे, तिला संपवून टाका, तरच तुमची प्रगती होईल,’ असा अघोरी सल्ला देणार्‍या देवऋषी महिलेविरोधात उच्चशिक्षित विवाहितेने ‘अंनिस’कडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी देवॠषीला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा सल्ला मान्य करण्यासाठी दबाव टाकणार्‍यांमध्ये नवरा, दीर व पोलीस हवालदार चुलत सासर्‍याचाही समावेश असून, संबंधितांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी ‘अंनिस’ला […]

Categories
बुवाबाजी

साबिया बाईचा सैलानी दरबार अंनिसने केला बंद

मे - २०१७

12 जानेवारी रोजी नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे अंगणवाडी सेविका बुवाबाजी करत असल्याची माहिती कॉ. बाबा आरगडे यांनी दिली. बाबांचे व माझे बोलणे झाल्याप्रमाणे नेवासा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पाठक सर गोधेगाव येथे जाऊन पाहणी करून व माहिती घेऊन आले. प्रत्येक रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमेला साबीया सय्यद या अंगणवाडी सेविकाच्या घरी मोठा दरबार भरतो. साबिया सय्यद यांच्या […]