Categories
अभिवादन

कॉ. पानसरेंच्या खुनाचा मास्टरमाईंड शोधा!

मार्च २०१९

– कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र! कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर धर्मांध सनातन्यांनी खुनी हल्ला केला, त्यातच ते शहीद झाले. त्याला 20 फेबु्रवारी 2019 रोजी चार वर्षे पूर्ण झाली. पोलीस यंत्रणेने खुनी शोधण्याचा प्रयत्न केला; पण तो अत्यंत अपुरा आहे. चार वर्षांत मारेकर्‍यांनी वापरलेले पिस्तूल, गाड्या, फरारी आरोपी किंवा मास्टर माईंड असलेला भोंदू बुवा यांच्यापर्यंत पोलीस पोचण्याचा प्रयत्न […]

Categories
संपादकीय

नादियाला सलाम!

फेब्रुवारी २०१९

नादिया मुराद. इराकमधील याझिदी या धार्मिक समूहातील ही युवती. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अत्याचाराला बळी पडलेली नादिया खचून गेली नाही. गुलाम म्हणून विकले गेल्यानंतर मोठ्या धैर्याने ती इराकमधून निसटली. तिने जर्मनीत आश्रय घेतला आणि जगाच्या व्यासपीठावर आपली दर्दभरी कहाणी सांगायला सुरुवात केली. ‘दि लास्ट गर्ल’ (The Last Girl) या आत्मवृत्ताद्वारे नादिया आणि याझिदी अल्पसंख्याकांवरील […]

Categories
कव्हर स्टोरी सत्यशोधक विवाह

आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांचा राज्यस्तरीय मेळावा!

फेब्रुवारी २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशक वर्षपूर्तीनिमित्त आणि मिश्रविवाह व महिला सहभाग विभागाच्या वतीने लातूर येथे 12 जानेवारी रोजी आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्थातच 3 ते 12 जानेवारी या दरम्यान राज्यात झालेल्या महिला सबलीकरण प्रबोधन अभियानाचा हा समारोप समारंभ होता. समितीचा मिश्रविवाह विभागही अतिशय प्रभावी व दखलपात्र असाच आहे. विचार व […]

Categories
जो.वि.नि परिषद

जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषद

फेब्रुवारी २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ व युवा विभागातर्फे या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस) दरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. या राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाची उद्घाटन परिषद लातूर येथील मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 200 युवकांनी व पालकांनी या […]

Categories
चळवळ जो.वि.नि

विवेकी समाजनिर्मितीसाठी कुटुंबसंस्थेतील चुप्पी तोडूया!

फेब्रुवारी २०१९

सध्या महा. अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियानाची सुरुवात जोरदार झालीय. 12 जानेवारी हा आपला ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि 14 फेब्रुवारी हा सगळ्याच तरुणाईला भुरळ घालणारा ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिन.’ या दोन दिवसांचं महत्त्व लक्षात घेत यावर्षीपासून आपण आपल्या जातिअंत विभाग आणि युवा विभागाच्या पुढाकारातून ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवणार आहोत, ज्याची सुरुवात […]

Categories
जो.वि.नि

जोडीदाराच्या निवडीसाठी युवकांशी संवाद साधूया!

फेब्रुवारी २०१९

सध्या सोशल मीडियावर मुलींच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, मुली कशा अविचारी अपेक्षा ठेवत आहेत, त्यामुळे त्यांचे लग्नाचे वय जास्त वाढत आहे, अशा एकतर्फी मांडणीचे मेसेज फिरत असतात. असे मेसेज मोठ्या प्रमाणात ‘शेअर’ करताना, तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना आपण पाहतो. तसेच लग्नानंतर मुले बायकोच्या नादाने कशी बिघडतात, आई- वडिलांना कशी विसरतात (किंवा […]

Categories
जो.वि.नि

‘महाराष्ट्र अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमामुळे आमचे सहजीवन सुखाचे आहे

फेब्रुवारी २०१९

‘लग्न’ जितका छोटा शब्द, तितकी मोठी, लांबलचक प्रोसेस.लहानपणापासूनच लग्न म्हणजे फार भारी वगैरे गोष्ट आहे, असं सांगितलं जातं; पण actually लग्नाला उभं राहेपर्यंत बर्‍याच बाबी कळत नाहीत. त्यात तुम्ही लोकांच्या ठराविक अपेक्षेत बसणारे नसाल तर अगदीच अवघड आहे. Graduation संपल्यानंतर लग्नाचा थोडाफार विचार घरात सुरू झाला. बरं, माझ्या बाबतीत विचार केला, तर मी स्वतःला कधीच […]

Categories
जो.वि.नि

जोडीदार निवडण्यासाठी माझ्या मुलींना स्वातंत्र्य दिले

फेब्रुवारी २०१९

मला दोन मुली आहेत- ‘आम्ही दोन, आमच्या मुली दोन.’ दोन्ही मुली डॉक्टर आहेत. मोठ्या मुलीचा स्वतःचा चिंचवड येथे डोळ्यांचा दवाखाना आहे. 15 वर्षांपूर्वी तिचा अहमदनगर येथील आमच्याच पोटजातीतील मुलाशी प्रेमविवाह झाला. जावई इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. कॉलेजमध्ये असतानाच ते एकमेकांना आवडू लागले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला याविषयी आधी माहीत नव्हते. मुलगी शेवटच्या वर्षात […]

Categories
जो.वि.नि युवा मानस

जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य

फेब्रुवारी २०१९

साधारण दोन वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. अंनिसच्या एका ज्येेष्ठ कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलेला प्रश्न मला यापूर्वी कुणीच विचारला नव्हता. तो प्रश्न असा होता की, ‘माझ्या मुलीचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना आम्हाला खूप मन:स्ताप झाला. आता माझी मुलगी परत लग्न करण्याचा विचार करीत आहे. तर नवरा आणि बायको […]

Categories
विज्ञान

विज्ञान आणि नीती

फेब्रुवारी २०१९

शहाणपणाचे नैतिक निर्णय घेण्यास विज्ञान मदत करते काय? नीतिमूल्ये आणि विविध प्रकारच्या श्रद्धा याबाबत जगभर मतभेद आणि संघर्ष दिसतो; पण अलिकडे विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे मानवाच्या भौतिक आणि नैतिक उद्दिष्टपूर्तीसाठी नवी ताकद मिळाली आहे. विज्ञानामुळे नवे गुंतागुंतीचे नैतिक कूटप्रश्न आपल्यासमोर उभे ठाकले असले तरीसुद्धा मूल्यांबाबतच्या पूर्वापार संघर्षातून नवी वाट शोधण्यास ते मदतीस येऊ शकते. मूल्यांबाबतची […]