शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती, संगमनेर शाखेच्या वतीने विविध विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 16 सप्टेंबरला रोजी पार पडला. यावेळी महा.अंनिस अहमदनगर जिल्ह्याचे सल्लागार बाबा अरगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुवाबाजीविरुद्ध संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी […]
लेखक: arc_admin
अंनिस नवी मुंबई शाखेने दिनांक 02 सप्टेंबर 2018 रोजी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 103 च्या प्रज्योत गायकवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुलाच्या शाळेतच पारितोषिक वितरण समारंभ घ्यावा असे शाखेने ठरवले व दिनांक 25 सप्टेंबर रोजी हा समारंभ शाळा क्र. 203 ऐरोली येथे […]
पौराणिकता, इतिहास, वर्तमान आणि भविष्यवेध या सार्वकालिक स्थितीतील संदर्भांचा साक्षेपी धांडोळा घेतला तर पुन्हा-पुन्हा हेच निदर्शनास येते की, समाजपरिवर्तनासाठी कुठल्याही स्तरावरील हिंसेच्या पुरस्काराला विरोधच केला पाहिजे. कारण आजपर्यंतच्या मानवी उत्क्रांतीतील विकासाच्या वाटचालीत माणसाने उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर हिंसेचा विनियोग कमी-कमी करीत आणलेला आहे. अर्थात, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाला संरक्षणात्मक सामग्रीच्या संशोधनाने गती दिली असली, तरी मानवी विवेकाने त्याच्यावर […]
खुनाचा तपास सूत्रधारांपर्यंत पोचेल?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. त्यानंतर गेली पाच वर्षे त्यांच्या खुनाच्या तपासात अनेक चढउतार झाले. खून झाल्याबरोबर लगेच त्या संदर्भात अनेक कयास विरोधक आणि पोलिसांकडून बांधण्यात आले. त्यात जातपंचायतविरोधी आंदोलनाने दुखावलेल्यांनी खून केला असावा, खडे विकणार्यांनी खून केला असावा वगैरेपासून या खुनामागे कुटुंबातील इस्टेटीची भांडणे आहेत, असे अनेक तर्क जाणीवपूर्वक मांडून […]
खून तपास प्रतिक्रिया
मारेकरी सापडावेत, ही इच्छाशक्तीच नाही – डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, अशी सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. गैरकृत्य करणार्या धर्मांध संघटनांवर बंदी घाला, अशी आमची मागणी असतानाही सरकार काहीच करीत नाही. […]
तपासाचा बाँब फुटणार काय?
अंनिसचे कार्यकर्ते कायद्यावर विश्वास ठेवतात. विवेकाने आणि संयमाने प्रतिक्रिया देतात. नुकताच खुनी पकडल्याच्या बातम्या आल्या आहेत; पण खुनी पकडला तरी आम्ही जवाब मागतो आहोत. मास्टरमाईंडपर्यंत कधी पोचणार? खुनी पकडला ही चांगली बाब आहे. त्याबद्दल अभिनंदन; पण मास्टर माईंडपर्यंत पोचले पाहिजे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे हवेत. मिळवलेले पुरावे न्यायालयात मांडले पाहिजेत. मगच शिक्षा होणार आणि न्याय […]
21 व्या शतकातही आपला समाज अजूनही देवींच्या जटांसारख्या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचे पहावयास मिळते. सातारा अंनिसच्या प्रयत्नांमुळे 50 वर्षीय सौ.मंगल चव्हाण रा. आबेपुरी पाचुपतेवाडी, ता.वाई, जि.सातारा यांच्या गेल्या 20 वर्षापेक्षाही जास्त काळ डोक्यावर असलेल्या साधारण अडीच ते तीन फुटी जटा सोडवून खर्या अर्थाने तिला या जटेच्या जोखडातून स्वतंत्र करण्याचे काम केले आहे. सौंदतीच्या यल्लमा देवीच्या असलेल्या […]
नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार व महा अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण दिनांक 10 जुलै 2018 रोजी करण्यात आले. यावेळी देहदानाचे संकल्प फॉर्मचे वितरण करण्यात आले. काहींना मंजुरी मिळाल्याचे संकल्प पत्र व ओळख पत्रे देऊन महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून महा अंनिसचे […]
20 ऑगस्ट 2018 हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 5 वा स्मृतिदिन. गेल्या 5 वर्षांत डॉक्टरांच्या खुनासंदर्भात वीरेंद्र तावडे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या वर्षी 19 ऑगस्टला डॉ. दाभोलकरांचा खुनी पकडला गेला, अशी बातमी आली. गेली पाच वर्षे दर महिन्याला, दरवर्षी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तपास यंत्रणांना ‘जवाब दो’ असा जाब रस्त्यावरून विचारत […]
पावसाळा सुरू झाला की, माणसांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचे वेध लागतात. आल्हाददायक श्रावणात कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करण्याची कल्पना किती आनंददायी आहे! उत्तर भारतातील हिंदी भाषिकांचा श्रावण (सावन) मराठी श्रावणाच्या 15 दिवस अगोदर सुरू होतो. पण या ‘सावना’त कुटुंबासोबत पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची कल्पनाही कुणी सुजाण मनुष्य करू शकत नाही. कारण? याच कालावधीत उत्तर भारतातील सुमारे 2 […]