यंदाची 20 ऑगस्टची सकाळ. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करायला पुण्याला बालगंधर्व पुलावर भरपावसातही तीनशे-साडेतीनशे लोकांचा जमाव आलेला; तेही कुणाच्या आदेशामुळे नव्हे, तर स्वप्रेरणेनं. थोर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेबाबा आढाव, श्रमिक संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर, सुजाण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीनं निघणार्या मोर्चाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. […]
विठ्ठल रामजी पुलावरून : ‘जवाब दो’