Categories
संपादकीय

भारतीय न्यायव्यवस्थेला सलाम

सप्टेंबर - २०१७

व्यक्तिविकासाला अडसर ठरणार्‍या विविध प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्याची धडपड मानवी समाजात अविरतपणे चालू आहे. ऐतिहासिक अशा या संघर्षात पुरुषप्रधानतेमुळे पुरुष जाती बंधमुक्त होणे सुलभ झालं; पण समाजाचा अर्धा घटक म्हणजे स्त्रीवर्ग तसा बंधनातच राहिला होता. भारतात उच्च वर्गातील स्त्रियांनी स्त्रीमुक्तीसाठी लढे दिले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब कर्वेआदी समाजसुधारकांनी स्त्रीसुधारणेच्या चळवळी उभारल्या. पण या चळवळी […]

Categories
कायदा

महाराष्ट्र अंनिसच्या, जातपंचायत मूठमाती अभियानाची वाटचाल…

सप्टेंबर - २०१७

28 जून 2013 : नाशिक येथे जातपंचायतीच्या दबावापोटी आंतरजातीय विवाह केलेल्या प्रमिला कुंभारकरचा जीव तिच्या बापाने घेतला. 30 जून 2013 : सामाजिक संघटनांचा नाशिक येथे भव्य निषेध मोर्चा. 2 जुलै 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा ‘जातिअंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा लेख दै.‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध. 3 जुलै 2013 : लेख वाचून भटक्याजोशी समाजाच्या बहिष्कृत अण्णा हिंगमिरे […]

Categories
कायदा जात पंचायत

जातशोषणाला लागणार लगाम

सप्टेंबर - २०१७

महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कृत करण्याला मोठा इतिहास आहे. परंतु किरकोळ अपवाद वगळता कुणी त्याबद्दल लिहिलेले नाही. महाराष्ट्रात नामांकित लेखक होऊन गेले; परंतु अण्णा भाऊ साठे वगळता कुणी त्यावर लिहिले नाही. त्यांनी ‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीवर कथा लिहिली आहे. अनेक समाज सुधारकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. परंतु त्याविरोधात कुणी आवाज उठवला नाही. एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Categories
कायदा जात पंचायत

जातपंचायतविरोधी कायदा जातिअंताच्या लढ्यातील महत्त्वाचे पाऊल

सप्टेंबर - २०१७

महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नानंतर, आंदोलनानंतर, खूप मोठ्या संघर्षानंतर जातपंचायतविरोधी कायदा मंजूर झाला आहे. सरकारमध्ये रोज नवीन कायदे मंजूर होत असतात, जुने कायदे दुरुस्त होत असतात. त्यापैकी हा कायदा नाहीये. या कायद्याचा संबंध सामाजिक परिवर्तनाशी, सामाजिक सुधारणांशी जोडावयास पाहिजे. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कधीतरी एक सामाजिक बदल घडवू शकतो. त्यादृष्टीने विचार केल्यानंतर हा कायदा […]

Categories
कायदा

कायद्याची कशी कराल अंमलबजावणी?

सप्टेंबर - २०१७

अंमलबजावणी? सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा झाला; परंतु आता प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी कायद्याचा प्रचार, प्रसार व जागृती होणे आवश्यक आहे. प्रकरण हाताळताना आपण सर्वांनाच कार्यकर्ता म्हणून सतर्क राहणेही आवश्यक आहे. “100 अपराधी सुटले, तरी चालेल; परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये,” हे कायद्याचे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून आलेल्या प्रकरणाची शहानिशा करणे, कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असेल. आपण […]

Categories
कायदा

जातपंचायतीविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

सप्टेंबर - २०१७

जातपंचांनी जातीच्या व्यक्तींसाठी जाचक नियम बनविणे, न्यायनिवाडे करणे, शिक्षा करणे, खुशालीच्या नावाखाली पैसे घेणे, बालविवाह लावणे, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व विधी पंचाच्या नियंत्रणाखाली (जबर दस्तीने) करणे, लग्न ठरविताना किंवा लग्न झाल्यानंतरही पाच कुळाच्या तपासातील खोट काढून लग्न रद्द ठरविणे, समाजातील व्यक्तींनी प्रथा, परंपरा, रिवाज मोडले सांगून बहिष्कृत करणे, जबर दंड मागणे अथवा वसूल करणे, नववधूची कौमार्य […]

Categories
जात पंचायत

महापुरुषांनाही जातपंचायतीचा जाच

सप्टेंबर - २०१७

महात्मा गांधी यांनी समुद्र ओलांडून परदेशगमन केले, तेव्हा त्यांची मोढ वाणिया जातपंचायत बसली. सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला. महात्मा गांधींना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. त्यांना मदत करणार्‍यास सव्वा रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता. त्यामुळे परदेशात जाताना व परत आल्यानंतरही त्यांना भेटण्यास कुणीही समाजबांधव पुढे आला नाही. त्यावेळी गांधीजींची प्राथमिकता देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, ही असल्याने त्यांनी […]

Categories
जात पंचायत

घटना जातपंचायतीच्या : अमानुष अत्याचाराच्या

सप्टेंबर - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जातपंचायतीच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत. त्या वाचून जातपंचायतीची दहशत समजून येते. एका समाजात जातपंचायतीकडून नववधूची कौमार्याची परीक्षा घेण्यात येते. लग्नानंतर पंचांनी दिलेल्या पांढर्‍या वस्त्रावर नवर्‍या मुला-मुलीने झोपल्यावर रक्ताचा डाग असेल तरच लग्न ग्राह्य धरण्यात येण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रक्ताचा लाल डाग नसेल, तर मुलीच्या […]

Categories
जात पंचायत

कोकणात अजूनही आहे गावकीचा धाक

सप्टेंबर - २०१७

भारतीय समाजात ‘एक स्वतंत्र व्यक्ती’ यापेक्षा एखाद्या धर्माचा, जाती- जमातीचा भाग असलेली स्त्री किंवा पुरुष असणे, हे माणसाच्या अस्तित्वाचे मूळ एकक आहे. जातपंचायत या रचनेची त्या-त्या जाती-जमातीतील पुरुष व स्त्रियांच्या जगण्यावर असलेली पोलादी पकड बघितली तर हे स्पष्ट होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जातपंचायतीच्या मनमानीविरोधातील लढा जसा वेग घेत गेला, तसे महाराष्ट्रामध्ये जातपंचायतींकडून केल्या जाणार्‍या […]

Categories
जात पंचायत

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याविषयी पीडित व्यक्तींच्या प्रतिक्रिया

सप्टेंबर - २०१७

इब्राहीम हसन शेख, जिल्हा अहमदनगर : हा कायदा जरुरी होता, तो झाला, हे फार चांगले झाले. या कायद्यासाठी महाराष्ट्र अंनिस देत असलेल्या लढ्याची कात्रणे काढून, त्याला निवेदन जोडून मी ते राज्यपाल व राष्ट्रपती यांना पाठवले होते. आता या कायद्याचा गावोगावी प्रचार होणे गरजेचे आहे. अजून हा कायदा पोलिसांपर्यंत पोहोचला नाहीये. मी पोलीस स्टेशनला गेलो आणि […]