Categories
संतविचार

अनुभव मंटप – बसवप्रणित उपासना स्वातंत्र्य

ऑक्टोबर – २०१७

शतकानुशतके शूद्र, पंचम व स्त्रियांना देवालयात प्रवेश नव्हता. त्या देवालय व्यवस्थेवर बहिष्कार घालून, पुरोहितशाहीला चपराक देत बसवण्णांनी इष्टलिंगरुपात प्रत्येकाच्या जवळच देव दिला आणि देहचि देवालय असल्याचे ठामपणे सांगितले. बहिष्कृत समाजाला धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य इष्टलिंगाच्या रुपात मिळाले. शरण षण्मुख शिवयोगी म्हणतात : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो, कोणत्याही जातीत जन्मलेला असो, गुरुकारुण्य प्राप्त करून अंगावर […]

Categories
उपक्रम

जळगावात सहावे डॉ. आंबेडकर विचार संमेलन संपन्न

ऑक्टोबर – २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या विचारसूत्रावर आधारित संमेलने महाराष्ट्रभर आयोजित केली जातात. याचाच एक भाग म्हणून ‘महिला’ हे विचारसूत्र घेऊन अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने जळगाव येथे हे संमेलन पार पडले. त्याचा हा वृत्तांत… संविधानाच्या माध्यमातून प्रबुद्ध भारताची निर्मिती आवश्यक – डॉ. अंजली मायदेव आंबेडकर. जातमुक्ती, पितृसत्ताकता यातून स्त्रीमुक्तीची भूमिका व विचार डॉ. […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

आईच्या मृत्यूनंतर अंनिसच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांनी केला देहदानाचा संकल्प

ऑक्टोबर – २०१७

सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे यांची आई लक्ष्मीबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी निधनानंतर कोणताही विधी न करता विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार केले. अस्थींचे विसर्जन नदीत न करता घरच्या बागेतील वृक्षाजवळ केले. 100 निराधार लोकांना भोजनपाकिटांचे वाटप केले. आईचे स्मरण म्हणून सर्व कुटुंबियांनी आईसमवेत घालविलेल्या आनंदाच्या क्षणाचे छायाचित्र प्रदर्शन भरविले. कुटुंबातील […]

Categories
मंथन

धर्म व विज्ञान : सांधेजोड अशक्य

ऑक्टोबर – २०१७

विज्ञान आणि धर्म हे दोन्हीही सत्य, ज्ञानाच्या शोधाचे मार्ग आहेत असे दाखविण्याची सध्या चाललेली धडपड ही बरीचशी मध्ययुगातील धर्माच्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि त्याच संकल्पनेचे पुनरुज्जीवनही आहे. उत्क्रांती म्हणजे नैसर्गिक जगताची रचना करण्याचा ‘ईश्वराचा मार्ग’; मानवामध्ये स्वसंवेद्यता निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे ‘उत्क्रांती’; ‘वैज्ञानिक शोधांमधून ईश्वराची योजनाच उघड होते’ आणि ‘विज्ञान ही माणसाला ईश्वरानेच दिलेली देणगी […]

Categories
परिवर्तन

सत्यनारायण पूजा ते अंनिस कार्यकर्ता…

ऑक्टोबर – २०१७

मी त्यावेळी इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. बहीण भावामध्ये मी सर्वांत मोठा होतो. आम्ही नाभिक समाजाचे असल्याने घरी वडिलांचे सलून होते. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. ते ‘शिवलीलाअमृत’ रोज वाच असत. एके दिवशी आमच्या सलूनमध्ये एका फिरत्या देवर्षी पिंगळ्याने आमच्या वडिलांना सांगितले की, दर अमावस्येला तुम्ही सत्यनारायणाची पूजा घाला. तुमची भरभराट होईल. आमच्या गावातील गणपुले काका […]

Categories
जात पंचायत

तुंग येथील नंदीवाले समाजाच्या तेरा जातपंचांवर गुन्हा दाखल

ऑक्टोबर – २०१७

तुंग, ता. मिरज येथील पांडुरंग तमाण्णा चौगुले (नंदीवाले) यांच्या कुटुंबास नंदीवाले जातपंचायतीने गेल्या 10 वर्षांपासून वाळीत टाकले होते. चौगुले यांनी 10 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाच्या विवाहास पाठिंबा दिला होता. त्यामुळे जातपंचायतीने त्यांना बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजाच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास, लग्न, मयत यावेळी बोलावले जात नव्हते. त्यांचे जगणे या जातपंचायतीने मुश्कील केले होते. […]

Categories
जात पंचायत

आंतरजातीय विवाह केल्याने तीन कुटुंबे बहिष्कृत

ऑक्टोबर – २०१७

तेलगू मडेलवार समाजातील तीन मुलांनी आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायत समितीने या तीन कुटुंबियांना वाळीत टाकण्याची घटना खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी समाजातील 9 पंचांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही धार्मिक, तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांत त्यांना सामावून घेतले जात नसल्याने या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तीन जणांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकाराने पुरोगामी […]

Categories
चळवळ

गांधी समजून घेताना…

ऑक्टोबर – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. 2 व 3 सप्टेंबर 2017 रोजी आचार्य दादा धर्माधिकारी सभागृह, सेवाग्राम, ता. जि. वर्धा येथे आयोजन करण्यात आले होते. या […]

Categories
परिवर्तन

अंनिस कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम

ऑक्टोबर – २०१७

कृष्णात आणि माझी ओळख तशी नवीनच; पण माझे लेख वाचून ते संपर्कात आले आणि आपला हा प्रवास सगळ्यांसोबत ‘शेअर’ करायला तयार झाले. कृष्णात हा कोल्हापूरला प्राथमिक शिक्षक आहेत. तर स्वाती आय.टी. क्षेत्रात नोकरी करते. कृष्णात आणि स्वाती दोघेही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. कृष्णातचे विचाराने प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि भाषेवर प्रभुत्व. त्यांनी त्यांचा प्रवास सहजसुंदर […]

Categories
उपक्रम

स्मशानभूमीत मुलीचा वाढदिवस साजरा

ऑक्टोबर – २०१७

सामान्य माणसांची भूताविषयीची भीती घालविण्यासाठी मअंनिस, बिलोली (जि.नांदेड) शाखेचे प्रधान सचिव कमलाकर जमदाडे हे बिलोली तालुक्यापासून सद्रापूर या खेड्यामध्ये राहतात, त्यांनी आपल्या चार वर्षांची मुलगी क्षितिजा हिचा वाढदिवस बिलोली या तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमीत करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी बिलोली येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी नगरपालिका, पोलीस प्रशासन व तहसीलदार यांची रीतसर […]