बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील प्रसिद्ध कापड व्यापारी, जाधव साडी सेंटरचे संचालक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोरी शाखेचे संस्थापक-अध्यक्ष दत्तराव साहेबराव जाधव यांचे 1 ऑक्टोबर 2017 रोजी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. विवेकी बाण्याने समाजात पुरोगामी विचार रुजविणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना […]