Categories
संतविचार

विवेकवादी साहित्यिका : बहिणाबाई चौधरी

वार्षिकांक - २०१७

शंभर वर्षांपूर्वी जेव्हा अजूनही गावात बैलगाडी हेच प्रवासाचे साधन होते, रॉकेलचा दिवा प्रकाशासाठी वापरला जात होता, घरातल्या जात्यावरच धान्य दळावे लागत होते आणि आजारपणावर देवाचा अंगारा हेच एकमेव औषध होते, अशा काळात एक अंगठेबहाद्दूर महिला नवर्‍याच्या मागे कच्ची–बच्ची सांभाळत समाजाचा अनुभव उघड्या डोळ्यांनी मांडते आहे, दैववाद, ज्योतिष आणि मायावादही नाकारते आहे आणि बजावते की, अरे […]

Categories
कविता

कार्यकर्त्यांच्या कविता

वार्षिकांक - २०१७

माझा पत्ता (अमृता प्रीतम) आज मी घरक्रमांक पुसला आहे आणि गल्लीच्या शिरोभागावरील गल्लीचे नाव हटवलेय आणि, प्रत्येक सडकेच्या दिशादर्शक नावावर रंग फासलाय कुणालाही कळू नये म्हणून पण, जर तुम्हाला मला भेटायचंच असेल तर, जगातील सर्व देशांत, सर्व खंडांत सर्व शहरांतील सर्व गल्ल्यांतील सर्व दारांवर थाप द्या……. असेल हा एक शाप वा वरही असेल! जेथे स्वच्छंदी-निर्भय-निर्धारी […]

Categories
आरोग्य

मन चकवा

वार्षिकांक - २०१७

आपल्या ज्ञानेंद्रियांनी मिळविलेली माहिती मेंदूकडे पाठविली जाते. मेंदू त्या माहितीनुसार जगाचं आकलन करतो. हे कार्य बहुतेकवेळा सुसंगतपणे चालते आणि नित्याचे व्यवहार सुकर होतात. पण कधी–कधी ज्ञानेंद्रियांनी पाठविलेल्या सिग्नल्समध्ये मेंदू बदल करतो आणि आपण फसू लागतो. आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा आपल्याला फसवू शकतात. आपल्याला भास होतात. सामाजिक उन्माद आपल्याला हिंसक बनवतो. मेंदूच्या आजारामुळे आपण विक्षिप्त बनलो. […]

Categories
अभिवादन

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणारे : प्रा. पी. एम. भार्गव

वार्षिकांक - २०१७

विज्ञान क्षेत्रातील बहुतेक शास्त्रज्ञ, सामाजिक प्रश्नांबाबत उदासीन असतात. प्रा. पी. एम. भार्गव याला अपवाद होते. रसायनशास्त्र सेल्युलर आणि मॉल्युक्युलर बायोलॉजी या मूलभूत विज्ञान शाखांत त्यांनी मौलिक संशोधन केले. पी. एम. भार्गव यांचे विशेष म्हणजे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी केलेले विशेष प्रयत्न. अंधश्रद्धांवर ते प्रहार करीत. बुवाबाजीवर आघात करीत. विद्यापीठात ज्योतिष शिकवण्याला त्यांचा विरोध होता. त्यासाठी […]

Categories
अभिवादन

इचलकरंजी येथील म.अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते टी. आर. शिंदे यांना अभिवादन

वार्षिकांक - २०१७

इचलकरंजी येथील म.अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते टी. आर. शिंदे यांचे 2 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1931 रोजी शितोळ अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे झाला होता. ते 1949 पासून इचलकरंजी येथे राहत होते. महाराष्ट्रातील महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते काम करत होते. केशवराव विचारे, डी. एस. नार्वेकर गुरुजी आणि […]

Categories
अभिवादन

प्रो. यशपाल

वार्षिकांक - २०१७

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानप्रसाराचा अखंड स्रोत जातव्यवस्था आणि मूर्तीपूजा यांच्या विरोधात असणार्‍या कुटुंबात यशपाल जन्माला आले. साहजिकच ते भविष्यात विज्ञानवादी न बनते, तरच नवल. पंडित नेहरू, इमर्सन, थोरो, टॉलस्टॉय यांच्या साहित्याने यशपाल यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले. भौतिक विज्ञानाचे शिक्षण पूर्ण केल्यावर यशपाल यांनी आपल्या क्षेत्रात संशोधन केलेच; पण भारतीय समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा त्यांनी जीवापाड […]

Categories
उपक्रम प्रासंगिक

विवेकी लघुपटांमधून जातिअंताच्या दिशेने…

वार्षिकांक - २०१७

‘जाता जात नाही ती जात’ ही जातीची नकारात्मक; पण खेदाने वास्तवदर्शी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या जातिअंताच्या लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी एका प्रभावी माध्यमाची जोड देणे, हे यंदाच्या व आगामी विवेक महोत्सवाचे प्रमुख प्रयोजन होते आणि असेल. कारण जात ही संकल्पना देखील एक अंधश्रद्धाच आहे; पण या अंधश्रद्धेचा पगडा समाजमानसावर गहिरा आहे. महाराष्ट्र अंनिस व आटपाट यांनी आयोजित […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

विस्तारणारी क्षितिजे कवेत घेताना…

वार्षिकांक - २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विशेषांकाच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधताना आनंद होत आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला आता जवळपास 52 महिने म्हणजे सव्वाचार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आभाळच कोसळल्याचं दु:ख, वेदना, संताप, पोरकेपणाची भावना, निराशा, हतबलता; तरीही कामाचा जोश केवळ बौद्धिकच नव्हे, तर भावनिक गुंतवणूक, कामात सातत्य, प्रचंड ऊर्जा अशा संमिश्र भावना आणि दृष्टिकोनाचा हा […]

Categories
कथा

सदाचाराचा ताईत

वार्षिकांक - २०१७

–हरिशंकर परसाई एका राज्यात गोंधळ उडाला की, भ्रष्टाचार खूप पसरलाय. एक दिवस राजाने दरबारी मंडळींना विचारले़, ‘जनता ओरडायला लागली आहे की, सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. आम्हाला तर आजपर्यंत कोठेही पाहावयास मिळाला नाही. तुम्हाला कुणाला दिसला असेल तर सांगा. दरबारामध्ये हजर असणारे सर्वच जन म्हणतात़ महाराजांना जर दिसला नसेल तर आम्हाला कसा दिसेल?’ महाराज म्हणाले़, “नाही […]

Categories
कथा

घबाड किंवा लबाडांची युती

वार्षिकांक - २०१७

–हरिशंकर परसाई ‘जैसे उनके दिन फिर गये’ हरिशंकर परसाई यांच्या हिंदी कथेचा स्वैर अनुवाद : बुवा–बाबा, राजकारण यांचे साटेलोटे हा प्रकार नवा नाही . जगभरचे राजे– रजवाडे ते आजकालचे राजकारणी ! यांची पध्दतशीर युती समाजलुटीचे जाळे विणून भोळ्या जनांना लुबाडत समाजात उजळ माथ्याने कसे राज्य करते, याचे खमंग दर्शन आजच्या बुवाबाजीच्या धुमाकूळ घातलेल्या जमान्यात समर्थपणे […]