Categories
पुस्तक परिचय

बाजारशरण ‘गुरू’ चरित्र

वार्षिकांक - २०१७

‘गुरूज’ या इंग्रजी पुस्तकाची लेखिका भावदीप कांग ही फ्री लान्स पत्रकार असून 21 वर्षे ती वेगवेगळ्या पत्रिकेसाठी लिहीत असते. तिच्या या पुस्तकात महर्षी महेश योगी, धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, माता अमृतानंदमयी, श्रीश्री रविशंकर, मुरारीबापू, जग्गी वासुदेव, रामदेवबाबा महाराज व भय्यू महाराज इत्यादी प्रसिद्धिझोतात असलेल्या, भन्नाट व्यक्तिमत्त्व असलेल्या ‘गुरूं’बद्दलचे लेख आहेत. आपल्या देशात बाबा–बुवांचे अमाप पीक आहे; […]

Categories
पुस्तक परिचय

‘गॉड्स मार्केट’

वार्षिकांक - २०१७

मीरा नंदा यांनी ‘गॉड्स मार्केट’ या त्यांच्या पुस्तकात अलिकडील राजकीय व धार्मिक घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत. मध्यम वर्गाच्या वाढत्या धार्मिकीकरणाचा शोध घेताना धार्मिकीकरण पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रतिगामी; प्रसंगी जीव घेणारे ठरत आहे. विद्वेष, विद्वान हे शब्दप्रयोग करून हिंदुत्वसेना फॅसिझमला खतपाणी घालत आहे, या निष्कर्षाप्रत लेखिका पोचतात. धार्मिकतेचे प्रदूषण कशा प्रकारे वाढत आहे व […]

Categories
बुवाबाजी

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर

वार्षिकांक - २०१७

हे एकच गुरू असतील की, ज्यांच्या नावापुढे दोनदा ‘श्री’कार असेल. 2009च्या फोर्ब्स या जागतिक संस्थेच्या भारतातील सात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत श्री श्री रविशंकर (यानंतर श्री श्री म्हणून पूर्ण लेखात उल्लेख असेल.) यांचे नाव झळकत होते. अध्यात्माच्या बाजारीकरणातून भरपूर मालमत्ता कमावलेले ते एक आध्यात्मिक जगाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. 1981 च्या सुमारास बंगळुरू येथे लहान रोपटे असलेले […]

Categories
बुवाबाजी

सद्गुरू जग्गी वासुदेव यांची ‘गुरु’गिरी

वार्षिकांक - २०१७

21 व्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्नं बघणार्‍या आपल्या देशाला प्रत्येक दशकाला प्रत्येक वर्षाला, एखाद्या नव्याकोर्‍या अवताराची गरज भासते व या अवताराला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विलक्षण असे काहीतरी करून जनसामाऩ्यांना अचंबित करावे लागते. मागील एक-दोन दशकांत जनसामान्यांसकट मध्यम व श्रीमंत वर्गाला मानसिक व शारीरिक आरोग्याची भलतीच काळजी वाटू लागली आहे. न परवडणारे हॉस्पिटल बिल्स व […]

Categories
बुवाबाजी

वादग्रस्त आसारामबापू

वार्षिकांक - २०१७

सप्टेंबर 2013 मध्ये स्वत:ला संतश्री म्हणवून घेणार्‍या 76 वर्षांच्या आसारामबापूंना 16 वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. बलात्काराच्या आरोपाबरोबर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर बंदीवासात ठेवणे, जादूटोणा, जमीन बळकावणे, दहशत माजविणे आणि खून असे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. पण इतके गंभीर आरोप असूनही हा खटला जलदगती न्यायालयात चालविला गेला नाही आणि आजही […]

Categories
बुवाबाजी

भुलभुलैय्या बाबा रामदेव

वार्षिकांक - २०१७

Rediff.com ने भारतातील 10 अतिवादग्रस्त गुरूंच्या यादीत बाबा रामदेवचा समावेश केला आहे. संत रामपाल, आसाराम बापू, स्वामी नित्यानंद, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश, रजनीश, चंद्रास्वामी, जयेंद्र सरस्वती, गुरमीत राम रहीम आणि सत्य साईबाबा हे ते दहा गुरू. बाबा रामदेवबाबत काय आक्षेप आहेत? तहेलका मासिकाने बाबा रामदेवच्या ट्रस्टमध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार असल्याचे उघड केले आहे. वृंदा करात […]

Categories
मुलाखत

आपला लढा धर्मकल्पनांशी आहे! – नागनाथ कोत्तापल्ले

वार्षिकांक - २०१७

–सुभाष थोरात, राजीव देशपांडे मराठी साहित्यविश्वात, महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात; किंबहुना एकूणच महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या व्यक्तिमत्त्वाला एक विशिष्ट स्थान आहे. हे स्थान ते केवळ साहित्यिक आहेत, 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, प्राध्यापक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते म्हणून प्राप्त झालेले आहे, असे नव्हे तर इथले जे […]

Categories
कार्यकर्ता मुलाखत

संयमी आणि चिकित्सक कार्यकर्ता : दीपक गिरमे

वार्षिकांक - २०१७

हंसयोग शिकविणारा शितोळे महाराज किंवा वज्रेश्वरीच्या ‘गुरुमाई’ आश्रम अशा कर्मकांडी व अंधश्रद्धाळू वातावरणात राहूनही आपल्या व चिकित्सक व अभ्यासू वृत्तीला न सोडणारे अंनिसचे कार्यकर्ते दीपक गिरमे यांच्या विवेकवादापर्यंतचा अंनिसच्या सहाय्याने झालेल्या प्रवासाचा आलेख या मुलाखतीतून डॉ. ठकसेन गोराणे यांनी रेखाटला आहे. “आम्ही व्यक्ती आणि समाजव्यवस्था या दोहोंमध्ये परिवर्तन करू इच्छितो,” असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे. […]

Categories
मानसमित्र

डिजिटल पालकत्व

वार्षिकांक - २०१७

–डॉ. प्रदीप पाटकर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संपर्क, शिक्षण, संप्रेषण, दैनंदिन व्यवहार अशा अनेक ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान डोकावत असून त्याला पर्याय नाही, अशी आजची स्थिती आहे. पालकत्व व शालेय शिक्षणही याला अपवाद नाही. मुले तंत्रव्यसनी होत आहेत, याची पालकांना काळजी वाटत आहे. हे नेट अ‍ॅडिक्शन व स्क्रीन अ‍ॅडिक्शन मनोविकार ठरत असून आभासी जगातून आपल्या पाल्यांना वास्तव […]

Categories
विशेष लेख

विविध देशांतील विज्ञान शिक्षण

वार्षिकांक - २०१७

विज्ञान युगातील विज्ञानाच्या शिक्षणाची विविध देशांत काय अवस्था आहे, याचा शोध लेखिकेने या निबंधात परिश्रमपूर्वक घेतलाय. सध्याची विज्ञान शिक्षणपद्धती आनंददायी आहे का, पोटभरू याचे उत्तर या लेखातून मिळेल. विज्ञान शिक्षण घेतलेली मंडळी देखील अंधश्रद्धाळू का याचे उत्तर त्यांच्या शिक्षणात मिळते, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे. अमेरिकेसारख्या देशात विज्ञान शिक्षणाची अवस्था आनंददायी नाही. शिक्षणक्षेत्राची जगभरातील चिकित्सा आपल्याकडील […]