Categories
व्यक्तिविशेष

डॉ. प्रकाश बंद्रे : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

जून – २०१७

काही-काही माणसांचं असणंच अवघा अवकाश व्यापून टाकणारं असतं. डॉ. प्रकाश बंद्रे सर हे त्यापैकी एक. माझी त्यांची पहिली भेट गोरेगाव येथील अंनिसच्या साप्ताहिक बैठकीत झाली. त्या बैठकीत बंद्रे सर बोलत होते आणि आम्ही सगळे ऐकत होतो. मी नुकतीच अंनिसची सदस्य झाले होते. त्या बैठकीमध्येच त्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, त्यांचा गाढा व्यासंग, […]

Categories
संपादकीय

र. धों. जिंकले – विरोधक हरले

मे - २०१७

अजित दळवी लिखित ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग भावे नाट्यमंदिर, सांगली येथे पाहण्याची संधी मिळाली. समाजातील एका प्रश्नासाठी आयुष्यभर एकाकी झुंज दिलेल्या रघुनाथराव धोंडो कर्वे या महान समाजसुधारकाच्या जीवनावर हे नाटक आधारलेले आहे. नाटक पाहताना अनेकदा डोळ्याच्या पापण्या अश्रूंनी ओल्या झाल्या. समाजाच्या रोषाविरोधात ठामपणे एकाकी […]

Categories
नाट्य-चित्र परिक्षण

समाजस्वास्थ्य : कालचे अन् आजचेही

मे - २०१७

र. धों. कर्वे यांनी लैंगिक शिक्षणाच्या हेतूने चालविलेल्या समाजस्वास्थ्य या मासिकास तत्कालीन परंपरावादी व सनातनी मंडळींनी विरोध केला. त्यासाठी र. धों.वर अश्लीलतेचा आरोप करून तीन वेळा खटले भरले. एका खटल्यात र. धों. ची बाजू डॉ. आंबेडकर यांनी मांडली होती. आजच्या काळात तर त्यांचे विचार मोकळे आणि प्रागतिक असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी […]

Categories
मुलाखत

चांगल्या लोकांनी चांगले विचार मांडत राहिले पाहिजे!

मे - २०१७

माणसांचं कामजीवन आणि लैंगिक शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यावर बोलणं हे आजही आणि सत्तर वर्षांपूर्वीही असभ्य आणि असंस्कृत समजलं होतं. पण अशाही परिस्थितीतही र. धों. कर्वे या आधुनिक समाजसेवकाने त्यावर बोलण्याबरोबरच सामाजिक शिक्षण व्हावं या हेतूने ‘समाजस्वास्थ्य’ नावाचं नियतकालिकही चालवलं. हे करत असताना र. धों. कर्वे यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. […]

Categories
व्यक्तिविशेष

र. धों. कर्वे यांचे बुद्धिवादी विचार

मे - २०१७

र. धों. कर्वे यांच्या समग्र वाङ्मयाचे संपादन करणारे प्रा. अनंत देशमुख यांनी खास अंनिवा वाचकांसाठी र. धों. कर्वे यांच्या वैचारिक भूमिकेची मांडणी या लेखात केली आहे. माणसाला मन आणि बुद्धी या दोन शक्ती जन्मत:च असतात. मन तसे चंचल असते. त्यात क्षणाक्षणाला असंख्य भावलहरी उमटत असतात. भाव, भावना, भावनात्मक तरंग, विकारवशता हे मनाशी संबंधित असे शब्द. […]

Categories
विशेष लेख

बुद्धिवाद आणि अध्यात्मवाद

मे - २०१७

बुद्धिवाद हा तर्कशास्त्रावर आधारलेला असतो आणि अध्यात्मवाद कल्पनेवर आधारलेला असतो, हा या दोहोंतला मोठा फरक आहे. ज्ञानाची कसोटी तर्कशास्त्र आहे. अध्यात्मवादात काही ज्ञान आहे आणि ते अंत:स्फूर्तीने मिळते, असा भ्रम धार्मिक लोकांत आढळतो. अंध:स्फूर्ती याला काही अर्थ असला, तर तो इतकाच की, कधी कधी जाणूनबुजून कोणताही विचार केल्याशिवाय आपल्या मनात एखादी कल्पना येते आणि ती […]

Categories
प्रासंगिक

‘डिप्रेशन’वर मात करण्यासाठी…

मे - २०१७

सात एप्रिल, हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. मानसिक आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीच्या आरोग्यदिनी, आपण सगळे मिळून ‘डिप्रेशन’वर बोलूयात..’, असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने जगभर ‘डिप्रेशन’विषयी जनजागृती करणारे अनेक कार्यक्रम झाले. सामाजिकदृष्ट्या कायमच दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर त्यामुळे चर्चेला तर चांगली सुरुवात झाली. मानसिक आरोग्याचा […]

Categories
जात पंचायत

संदीप… मरते नहीं!

मे - २०१७

भावकी, जातपंचायत, खापपंचायत यासारख्या जाचक गोष्टी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातून अजूनही नष्ट झाल्या नाहीत. विशेषत: कोकणात भावकीच्या प्रथेने मानवतेकडे जाणारे अनेक संवैधानिक मार्ग रोखले आहेत. शासनाच्या पातळीवर याविषयी कायदे झाले, विशेषत: जादूटोणाविरोधी विधेयकामुळे भावकीच्या दडपशाहीतील अंधश्रद्धा कमी झाली; परंतु भावकीतले सामंती वर्चस्व मात्र कमी झाले नाही. आपल्या देशात एकीकडे संविधान जागृतीचा नारा चालू असताना दुसरीकडे कोकणात […]

Categories
अघोरी प्रथा

आत्म्याच्या शांतीसाठी बालकाचा नरबळी

मे - २०१७

एका घरातील महिलेने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून घरात सुख-शांती नसल्याचा समज कुटुंबियांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे मृत महिलेची समाधी बांधण्यासाठी व तिच्या आत्म्याची शांती करण्यासाठी सहावर्षीय बालकाचा नरबळी देण्यात आल्याची घटना कळंब (जि. उस्मानाबाद) पोलिसांनी उघडकीस आणली आहे. कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा 26 जानेवारी रोजी […]

Categories
जादुई वास्तव

विविध प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

मे - २०१७

प्रकरण 3 ही जीवसृष्टी कशी निर्माण झाली ते सांगणार्‍या कितीतरी लोककथा, मिथककथा आहेत. जीवसृष्टीची वैशिष्ट्ये कशी निर्माण झाली हे सांगणार्‍या तर कितीतरी कथा. खारीच्या पाठीवर रेघा का, मोराला पिसारा कुठून आला, पोपटाचा रंग हिरवा कसा झाला या सार्‍यांचा खुलासा करणार्‍या कथाच कथा आहेत. पण इतक्या प्रकार-प्रकाराचे आणि आकार-उकाराचे प्राणी कसे अस्तित्वात आले ते सांगणार्‍या कथा […]