सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्कार होण्याच्या काळात शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आता तरी बहुतेक बुवा–बाबा शालेय विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना आवरणे हेही काम आहेच. पाठ्यपुस्तके बदलण्याच्या निमित्ताने याचा विचार शिक्षक, पालक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केलाच पाहिजे. समाजाच्या विकासात शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे. आजपर्यंतच्या ज्ञानाचे संचित पुढच्या पिढीला पोचवण्याचे काम शिक्षण करत असते. समाजातले सर्व गोष्टींचे व्यवस्थापन शासन […]
लेखक: arc_admin
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खालील मागण्यांचे निवेदन मा. न्यायमूर्ती सी.एल.थूल यांना सांगली, कोल्हापूर व लातूर शाखेच्या वतीने देण्यात आले. प्रती, मा. न्या. सी. एल. थूल अध्यक्ष, आंतरजातीय विवाह विशेष ड्राफ्टिंग समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय : आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन अडचणी व सूचनांबाबत….. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून विनम्रपणे कळविण्यात येते की, महामानव डॉ. बाबासाहेबांचे विचार मोठ्या […]
कृतज्ञता सोहळा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर येत्या 15 जुलै रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ‘ज्येष्ठ नेते भाई एन. डी. पाटील कृतज्ञता सोहळा’ 15 जुलै रोजी कोल्हापुरात आयोजित करीत आहोत. एन. डी. पाटील सर केवळ […]
एप्रिल महिना दरवर्षीच तसा धामधुमीचा असतो. क्रांतीबा जोतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम मोठ्या धडाक्यात साजरे होत असतात. हेही वर्ष काही त्याला अपवाद नव्हते. महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची महाराष्ट्रव्यापी स्वागत आणि अंमलबजावणी परिषद मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. (त्याचा सविस्तर वृत्तांत आपण याच अंकात इतरत्र दिला […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जातपंचायतीच्या मनमानीविरोधात लढा उभारून, त्यांच्या अत्याचाराने पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा आणण्यासाठी, चार-पाच वर्षे संवैधानिक मार्गाने केलेला अविरत संघर्ष यशस्वी होऊन 2017 साली सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अस्तित्वात आला. असा कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले. त्यानिमित्त, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, […]
जातशोषणाला लागणार लगाम
महाराष्ट्रात जातपंचायतींच्या सामाजिक बहिष्काराला मोठा इतिहास आहे. परंतु लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वगळता कुणी त्यावर लिहिले नाही. त्यांनी ‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीवर कथा लिहिली आहे. अनेक समाजसुधारकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला; परंतु त्याविरोधात कुणी आवाज उठवला नाही. एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952 मध्ये एका कमिशनसमोर गावकीच्या विरोधात साक्ष दिली होती. आज अनेक कायदे […]
आसारामबापूंच्या विरुद्ध 6 ऑगस्ट 2013 रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यात कलम 8 नुसार पॉकसो कायदा (Protection of Children from Sexual Offences Act) आणि भारतीय दंड संहिता कलम 342, 376, 506 , 509 नुसार तसेच ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट या कायद्यांप्रमाणे कलम 23 व 26 अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. त्यातील तरतुदींनुसार मरेपर्यंत जेल जन्मठेप अशी शिक्षा […]
उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल 19 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने सुनावणी झाली. या दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे आपण अॅड. अभय नेवगी यांच्यामार्फत जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा म्हणून याचिका दाखल केली होती. आज अखेर या याचिकेवर वीसपेक्षा अधिक वेळा […]
अंबाबाई मंदिर आता सरकारच्या ताब्यात
अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी–महिलांनाही संधी! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करण्याबाबतचे विधेयक 28 मार्च 2018 रोजी विधानसभेत आणि विधान परिषदेत संमत करण्यात आले. त्याचे राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. क्रांतिकारक निर्णय : या विधेयकानुसार पुजारीपदासाठी परीक्षा घेऊन नियुक्ती केली जाईल. यामध्ये 50 टक्के महिला पुजार्यांचा समावेश असणार आहे. विधी व न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील […]
रात्रीच्या अंधारात नीरभ्र आकाशाचे निरीक्षण करत असताना आपल्या मनाच्या कोपर्यातील काही प्रश्न आपल्याला सतावत असतात. कुतूहल म्हणून आपण त्या प्रश्नांचा विचार करत असतो. आकाशाकडे पाहिल्यानंतर आकाशाच्या पलिकडे काहीतरी असेल का, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे भवितव्य काय, विश्वनियमांच्या मागे काय आहे इत्यादी प्रश्नांचा शोध घेत आपण परमेश्वरापर्यंत पोचतो व तेथेच आपले कुतूहल संपते. आपल्यासारख्या […]